ट्रकखाली चिरडून पादचाऱ्याचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पळून गेला. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोळपेवाडी साखर कारखान्याच्या गट ऑफिससमोर हा अपघात झाला.

संजय रघुनाथ चव्हाण (वय ३९, कोळपेवाडी) हे रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकची (एम एच १७ ए ६०८९) त्यांना धडक बसली. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत नानासाहेब रघुनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी फरार ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास हेड कॉन्स्टेबल सतीश नामदेव भताने करत आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24