उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू ; नातेवाईकांनी डॉक्टारला दिला चोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- डॉक्टर हा देव नाही मात्र रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी नक्कीच प्रयत्नांची बाजी लावत असतो.

कोरोनाच्या संकटमय काळात देखील या कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र अशाच डॉक्टारांना मारहाण झाल्याची घटना महसूलमंत्री थोरात यांच्या संगमनेरात घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण केल्याची घटना संगमनेरमधील संजीवनी हॉस्पिटल मध्ये घडली आहे.

यावेळी एका वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की संगमनेर महाविद्यालयाजवळ असणाऱ्या संजीवन हॉस्पिटलमध्ये काल हसनापूर येथील एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता.

त्याच्यावर उपचार सुरू असताना अचानक तो मयत झाला. यामुळे नातेवाईक संतप्त झाले, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी हुज्जत घातली एकाने ज्युनिअर डॉक्टरला मारहाण केली.

यावेळी मोठा जमाव एकत्र आला यातील काहींनी एक वाहनांची तोड फोड केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलीस प्रशासन पोहचले.

यावेळी तणाव निर्माण झाला होता. यावेळी रुग्णालय अधिकारी विरुद्ध आरोप करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात आला नव्हता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24