अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- जमिनीच्या वादातून तसेच या व्यवहारातून अनेकदा मारहाण, खून आदी घटना घडलेल्या आहेत.
तसाच काहीसा प्रकार नेवासा तालुक्यातील सोनई मध्ये घडला आहे. दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, सोनई नजिकच्या बेल्हेकरवाडी रस्त्यालगतच्या सामायिक क्षेत्रात राहत असलेल्या
जालिंदर मच्छिंद्र सापते यांंना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार नुकताच घडलाय. याप्रकरणी देण्यात आलेल्या लेखी निवेदनाची दखल घेत सोनई पोलिसांनी दत्तात्रय रामजी शिंदे आणि दिगंबर रामजी शिंदे
या दोघा बंधूंविरुध्द तक्रार दाखल करुन घेतली आहे. फिर्यादी सापते यांनी सांगितले, की बेल्हेकरवाडी येथील गट नंबर १३१ मध्ये दत्रात्रय रामजी शिंदे, सुवर्णा कैलास व्यवहारे यांनी काही क्षेत्र घेतलेले आहे.
त्याठिकाणी असलेल्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी सर्वजण वापरतात. मात्र दि. १६ नोव्हेंबर रोजी दिगंबर रामजी शिंदे यांनी हातात लोखंडी हत्यार आणि दगड घेत सापते यांना शिवीगाळ करत सापतेंच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच हे ‘शिंदे बंधू गुन्हेगारी प्रवृृृत्तीचे असून या दोघांपासून आमच्या कुटुंबियांच्या जिविताला धोका निर्माण झाला असून या दोघांविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सापते कुटुंबीयांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved