अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- दारूचे दुकाने खुली केली जातील, असे सरकारने सांगितले असले. परंतु, नगर जिल्ह्यातील दुकाने तात्काळ सुरू करू नयेत, असा आदेश उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी काढले आहेत.
सरकारने दारू दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
नगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असला, तरी पुढील आदेशापर्यंत नगर जिल्ह्यातील कोणीही दारू, बियर, वाईन विक्रीचे दुकाने सुरू करू नयेत, असे पत्र अधीक्षक नवलकर यांनी जिल्ह्यातील सर्व परवानाधारक दारू विक्रेत्यांना दिले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यातील मद्यपींची निराशा झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®