अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- कोरोना नियंत्रणासाठी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने आणखी एक पाउल पुढे टाकले आहे.
आगामी गळीत हंगामाची होणारी सुरूवात लक्षात घेवून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची करोना स्वॅब टेस्ट करण्याच्या उपक्रमाची सूरुवात करण्यात आली.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनच्या सहकार्याने या टेस्ट करण्यात येणार आहे. प्रवरानगर येथे कारखाना कार्यस्थळावरील रुग्णालयात या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
अवघ्या काही दिवसात सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सुरूवात होणार आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामाचे पुर्व नियोजन सध्या सुरू आहे.
याचाच एक भाग म्हणून डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन तथा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला.
करोना संकटाच्या काळात विखे पाटील परिवाराने सामाजिक बांधिलकी ठेवून आरोग्याचे विविध उपक्रम राबवून जागृकता निर्माण केली.
गळीत हंगाम सुरू होणार असल्याने कारखान्यातील कामगारांच्या आरोग्याबाबत त्यांना स्वतःला आणि व्यवस्थापनाला माहीती असावी या उद्देशाने हा उपक्रम घेतला असल्याचे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विखे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टिम यासाठी नेमण्यात आली आहे.
रोज २५० ते ३०० कामगारांची टेस्ट घेतली जाणार असून येणाऱ्या रिपोर्टनूसार कामगारांना आरोग्याच्या संदर्भात पुढील मार्गदर्शनही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved