दिल्ली – महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय नाट्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकार राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची बदली करू शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची कोशारी यांच्या जागी नियुक्ती होऊ शकते. मिश्र हे हिमाचल प्रदेश येथून स्थानांतरित होऊन 9 सप्टेंबर रोजी राजस्थानचे राज्यपाल झाले होते.
उत्तराखंडचे सीएम आणि राज्यसभा सदस्य राहिलेले कोशारी यांच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते.
पार्टीचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले की राज्यपालांनी संविधान, नियम, कायदे याची बिलकुल पर्वा केली नाही. त्यांनी संविधानाची हत्या केली, असे म्हणून त्यांना राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी असे बजावले होते.