अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असताना अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी मोबाईल व इंटरनेट सेवा गरजेची झाली असून, या लॉक डाऊनमुळे सर्व सामान्य नागरिकांना मोबाईल रिचार्ज करता येणार नाही.
यामुळे मोबाईल व इंटरनेटची सेवा खंडित न करता ती नागरिकांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी केली आहे. आजच्या दैनंदिन जीवनात मोबाईल देखील गरजेची वस्तू बनली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक जीव मुठीत धरुन जगत आहे. नागरिकांवर काही आपत्ती ओढवल्यास किंवा मदतीची मागणी करण्यासाठी तर इतर जिल्ह्यात असलेल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईलची गरज भासत आहे.
मार्च महिना संपत असताना अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या मोबाईलची सेवा खंडित होणार आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, इतरांना संपर्क साधणे अवघड होणार आहे.
शासनाने अन्न, धान्यासह आर्थिक मदत सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना वापरत असलेल्या मोबाईलच्या सेवा खंडित न करता पुढील तीन महिन्यासाठी कॉलिंग व इंटरनेटची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्याची मागणी सुनिल सकट यांनी केली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com