माजी आ. नरेंद्र घुलेंना विधानपरिषदेवर घेण्याचे मागणी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शेवगाव :- राष्ट्रवादीची स्थापना करताना सर्वात प्रथम स्व.मारुतराव घुले पाटलांनी समर्थन दर्शवत शरद पवाराना पाठिंबा दर्शविला, आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहात घुले यांनी पवारांची साथ सोडली नाही.

जिल्ह्याची वाताहत होत असताना घुले बंधुंनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आघाडीसाठी महत्वाची भूमिका बजावत जिल्ह्यात १२ /० चे गणित बदलवत ३/९ करुन पक्ष संघटनेचा पाया मजबुत केला.

याच दरम्यान पक्षाशी प्रामाणिक असलेल्या नरेंद्र घुलेंना विधानपरिषदेत घेण्याची मागणी तालुक्यातील युवक वर्गातून जोर धरु लागली आहे. १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाली.

नगर जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आशी दोन पक्ष समोर आसताना आनेक नेत्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.

परंतु जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान भुषवलेल्या स्व.मारुतराव घुले पाटलानी कशाचाही विचार न करता राजकारणापेक्षा समाजकारणाची कास धरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

नगर जिल्ह्याच्या राजकारणात पक्षाची महत्वाची भूमिका पार पाडण्याचे काम त्यांनी समाजकारणातुन केले.

पक्ष सत्तेत आसताना आणि पक्ष आडचणीत आसताना मारुतराव घुलेच्या पाठोपाठ नरेंद्र घुले आणि चंद्रशेखर घुले यानी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत पक्षासाठी योगदान दिले.

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत विरोधी पक्षात बसण्यासाठी लागणारे बहुमत देखील कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षाला मिळणार नसल्याचे सांगत भाजपाने महाराष्ट्रात राण उठवले होत,े तर दुसरीकडे नगर जिल्ह्यात १२/० चा नकशा करु म्हणत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाला आवाहन उपलब्ध करुन दिले होते.

परंतु माजी आमदार नरेंद्र घुले आणि चंद्रशेखर घुले यांनी महत्वाची भुमिका पार पाडत १२ /० चा आकडा ३/९ करत आघाडीसाठी मोठा विजय खेचुन आनत यश संपादन केले.

या परिस्थितीत माजी आमदार नरेंद्र घुले घुले यांना विधानपरिषदेच सदस्यत्व मिळावे. यासाठी शेवगाव तालुक्यातील सभापती ॲड. आनिल मडके, संतोष पावसे,मिलिंद गायकवाड , सागर घोरतळे, मोहित पारनेरे, प्रकाश काळे सह परिसरातील युवक कार्यकर्त्यांच्यावतीने राष्ट्रवादीच्या श्रेष्ठीकडे मागणी केली जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24