अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडे तीन कोटी रुपये खर्च करुन झालेल्या तपोवन रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असताना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने रविवारी टक्केवारी भज्ञाक सुर्यनामा आंदोलन करण्यात आले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांच्या हस्ते सदरील खड्डेमय रस्त्यास प्रतिकात्मक लोकभज्ञाक व्हॅक्सिन देण्यात आले.
स्पीक अहमदनगर स्पीक मोहिमेतंर्गत वेबीनार घेऊन तपोवन रस्त्याच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात सर्वसामान्य नागरिकांनी मते नोंदवली.
तर या प्रकरणातील आरोपींवर खटले दाखल व्हावे व त्यांची संपत्ती जप्त करुन सदर रस्त्याचे काम पुन्हा गुणवत्तापुर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात अॅड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, कॉ.सुधीर टोकेकर, शाहीर कान्हू सुंबे आदि सहभागी झाले होते.
लॉकडाऊनपुर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तपोवन ते बोल्हेगाव 4.95 कि.मी. रस्त्याचे काम झाले. या कामासाठी साडे तीन कोटी रुपयाचा निधी आला. या निधीतून दर्जेदार काम होणे अपेक्षित होते.
मात्र टक्केवारीमुळे या कामात मोठा भ्रष्टाचार होऊन रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले नाही. पावसाने या रस्त्यावर खड्डे पडले असून, नागरिकांच्या या रस्त्यासंदर्भात अनेक तक्रारी आहेत.
हा भ्रष्टाचार उघडकीस आनण्यासाठी या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने टक्केवारी भज्ञाक सुर्यनामा आंदोलन करण्यात आले. वेबीनारच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी संपुर्ण रस्त्याची झालेली दुरावस्था व निकृष्ट काम नागरिकांना दाखवून भ्रष्टाचाराची पोलखोल केली.
अॅड. गवळी यांनी तपोवन रस्त्याचे झालेले काम भ्रष्टाचाराचा नंगानाच आहे. राजकारणी यांनी टक्केवारीचा धंदा बनवला आहे. लोकशाही जगविण्यासाठी लोकभज्ञाकची गरज आहे.
लोकांची भक्ती, आस्था व प्रश्न समजवून घेऊन ते सोडवणे व लोककल्याणासाठी कर्म करणे ही लोकभज्ञाकची व्याख्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश थोरात यांनी तपोवन रोडचे झालेले काम अत्यंत निकृष्ट आहे.
रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व भराव तांत्रिक दृष्ट्या योग्य नसून, या कामाची गुण नियंत्रण विभागा मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
अशोक सब्बन यांनी टक्केवारीच्या कामामुळे शहरात चांगली कामे होत नाही. कामामध्ये असलेली टक्केवारी ही लोकशाहीला लागलेली किड असून, ही किड दूर करण्यासाठी नागरिकांनी जागृक होण्याची व आवाज उठविण्याचे आवाहन अशोक सब्बन यांनी केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com