अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : एकाच्या प्रेमाला नकार तर, दुसर्यासोबत प्रेम असूनही लग्नास नकार दिल्याने या दोन तरुणांनी तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केली. ज्याला प्रेमासाठी नाकारले त्याने संबंधित तरुणीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंटद्वारे त्या तरुणीची बदनामी केली.
लग्नास नकार दिलेल्या तरुणाने त्याने तिला व्हाट्सअपवर मेसेज करून व फोन करून त्रास दिला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी संकेत नानासाहेब गाडेकर (रा.राजापूर ता.संगमनेर), तेजस कैलास ससकर (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) यांना अटक केली.
जानेवारीमध्ये संगमनेर तालुक्यातील एका तरूणीने नगर सायबर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. संकेत गाडेकर याने या तरुणीला काही दिवसांपूर्वी प्रेमाचा प्रस्ताव दिला होता.
त्यास तरूणीने नकार दिला होता. तेव्हापासून संकेतच्या मनामध्ये तिच्याविषयी राग होता. त्याने संबंधित तरुणीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून त्यावरून तरुणीची बदनामी केली गेली.
दुसरा तरूण तेजस ससकर याचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या सहमतीने ते काही दिवस एकत्रही राहिले. तेजसची इच्छा लग्न करायची होती. परंतु, तिने लग्न करण्यास नकार दिला.
याचा राग तेजसला होता. त्यामुळे तो व्हाट्सअपवर मेसेज आणि फोन करून नेहमी त्रास देत होता. दरम्यानच्या काळात संबंधित तरुणीने दुसर्या व्यक्तीसोबत लग्न केले. लग्न झाले तरी तिची बदनामी सुरु होती. त्यामुळे तरुणीने सायबर पोलीसात फिर्याद दिली.
या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस शिपाई अभिजित आरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड, भगवान कोंडार, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तपास लावला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews