बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे आधीच हतबल झालेले शेतकरी गेल्या काही महिन्यापासून मोठ्या चिंतेत पडले होते. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटात पाडले होते.

यातच शेतकऱ्यांवर नव्याने बोंडअळीचे संकट आले आहे. या अनुषंगाने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी एक आवाहन करण्यात आले आहे. गुलाबी बोंडअळीचा कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पावसामुळे काही शेतकरी कपाशीचे पीक शेतामध्ये ठेवण्याचा आग्रह धरतील.

मात्र, असे करू नये. गुलाबी बोंडअळीचा नायनाट करावयाचा असल्याने कपाशी लवकर उपटावी. शेतामध्ये तुकडे करून टाकावेत, अथवा कंपोस्ट खतासाठी जमिनीत गाडावी. अळीची साखळी तोडण्यासाठी नवीन पीक हरभरा अथवा गहू घेण्याची गरज आहे. पाऊस चांगला झाल्याने हरभरा व गहू ही पिकेही घेता येतील.

शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक डिसेंबरअखेरपर्यंत काढून टाकावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळावी यासाठी कृषिविभागाने महत्वाची पाऊले उचलली आहे.

कृषी विभागाकडून रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून शेतकऱ्यांना माहिती देऊन कपाशीचे पीक उपटून नवीन पीक घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24