अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावातील दहा शेतकऱ्यांचा सुमारे विस ते पंचवीस एकर उस जळुन खाक झाला आहे. रविवारी दुपारनंतर दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.
उसातुन आगीचे लोळ दिसु लागले शेतकरी घाबरले. उसाच्या बाजुने विजेच्या तारा गेलेल्या आहेत. विजेच्या तारेमुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
याबाबत सव्सितर असे की, जांभळी गावातील अर्जुन रघुनाथ आव्हाड, सुमन आश्रुबा आव्हाड,भगवान निवृत्ती आव्हाड राधाकिसन निवृत्ती आव्हाड ,जनार्दन कारभारी आव्हाड,नवनाथ नारायण आव्हाड ,महादेव सुखदेव आव्हाड यांचा सुमारे विस एकर क्षेत्रावरील तोडणीला आलेला उस जळाला.
आगीचे अत्यंत रुप रुद्र होते. विजेमुळे आग लागल्याने कोणीही शेतकरी आग विझविण्यासाठी पुढे येण्यास घाबरत होते. पाथर्डी नगरपरीषदेच्या आग्नीशामक पंपाने आग विझविली.
आगीत अर्जुन रघुनाथ आव्हाड यांचे राहते घर जळून खाक झाले. आव्हाड यांचा संसार उघड्यावर आला आहे. शेतक-यांनी वर्षभर कष्ट करुन तयार केलेले उसाचे पिक आगीत जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या विजेच्या तारामुळे आग लागली त्यांच्याकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.