राहता :- तालुक्यातील पुणतांबा येथील सम्राट परमीट बार हॉटेल फोडून १ लाख ९९ हजार २०० रुपये किमतीची विदेशी दारु चोरुन नेल्याप्रकरणी एकास व चोरीची दारु विक्री केल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले.
हॉटेल सम्राटमधून ६ एप्रिलला रात्री १ लाख ९९ हजार २०० रुपये किमतीचे विदेशी दारुचे २७ बाॅक्स अज्ञातांनी चोरुन नेले, अशी फिर्याद प्रशांत वाघ (पुणतांबा, ता. राहाता) यांनी दिली होती.
ही चोरी कैलास भानुदास कुऱ्हाडे ( ३७ रा.चितळी ता.राहाता) याने केल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा लावून आरोपी कैलास कुऱ्हाडे याला पकडले.
त्याला पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने दारु चोरी गणेश ऊर्फ सिताराम भानुदास कुऱ्हाडे (फरार), सचिन मधुकर कुऱ्हाडे (फरार, दोघे रा.चितळी, ता.राहाता),
राहुल सुरेश जाधव (फरार, रा. प्रवरासंगम, ता. नेवासे), संभा (फरार, पूर्ण नाव माहिती नाही, रा. भेंडाळा ता.गंगापूर जि.औरंगाबाद) आदिंनी मिळून केली,
तर चोरलेली दारु बाॅक्स ही गणेश कुऱ्हाडे याच्या इंडिकातून आणली. यातील दारु बाॅक्स ही नितीन निकाळजे (२७, रा.गोंधवणी रोड, ता.श्रीरामपूर) व बाळू ऊर्फ कैलास झिरे (२४, नेवासे बु.) यांना विकल्याची कबुली दिली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®