धमाल ऑफर ! स्वस्तात मिळेल Datsun च्या कार ; जाणून घ्या सविस्तर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- Datsun ने आपल्या कारवर जानेवारी ऑफर सुरू केले आहेत. या महिन्यात डॅटसन गो, रेडिगो, गो प्लस या कार्सवर 40,000 रुपयांपर्यंतच्या फायद्यासह घरी आणता येतील.

या फायद्यामध्ये कॅश सूट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे. कॉर्पोरेट ऑफर निवडक कॉर्पोरेट आणि वैद्यकीय व्यावसायिकांना लागू आहे. डॅटसनच्या ऑफरचा लाभ 31 जानेवारी 2021 पर्यंत मिळू शकेल. जाणून घेऊया सविस्तर.

Redi-GO :- जानेवारीमध्ये डॅटसन रेडी गो 35000 रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह खरेदी करता येईल. कारवर 15000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 15000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर आहे. रेडी गोची एक्स शोरूम (दिल्ली) किंमत 2,86,186 रुपये पासून सुरू होते.

 डॅटसन GO आणि GO + :- डॅटसन गो आणि गो प्लस या दोन्ही कारवर 40,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे. यामध्ये 20000 रुपयांची कॅश डिस्काउंट, आणि 20000 रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. डॅटसन गो ची एक्स-शोरूम (दिल्ली) किंमत 4,02,778 रुपयांपासून सुरू होते. गो प्लसची एक्स-शोरूम (दिल्ली) किंमत 4,25,926 रुपये पासून सुरू होते.

होंडा आणि Renault च्याही ऑफर :- डॅटसन व्यतिरिक्त कार कंपनी Renault आणि होंडा यांनी जानेवारी महिन्यात आपल्या मॉडेल्सवर ऑफर्स सुरू केल्या आहेत. ऑफर अंतर्गत Renaultचा टायबर, क्विड आणि डस्टर 65000 रुपयांपर्यंतच्या फायद्यासह खरेदी करता येईल.

त्याचबरोबर होंडाची अमेझ, अमेझ स्पेशल एडिशन, अमेझ एक्सक्लुझिव्ह एडिशन, डब्ल्यूआर-व्ही, डब्ल्यूआर-व्ही एक्सक्लुझिव्ह एडिशन, न्यू जॅझ, 5th जनरेशन सिटी आणि सिव्हिक सेडानचा 2.50 लाख रुपयांपर्यंत फायदा आहे. दोन्ही कंपन्यांच्या ऑफरचा लाभ 31 जानेवारी 2021 पर्यंत मिळू शकेल.

अहमदनगर लाईव्ह 24