अहमदनगर :- सरकारने पाच वर्षे खोटी आश्वासने देत सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक केली. ज्यांना जनतेने चौकीदार केले त्यांच्या डोळ्या देखत मल्ल्या आणि निरव मोदी पळून गेले.
पाच वर्षांत लोकांच्या खात्यात पंधरा लाख, तर दूरच साधे पंधरा पैसे देखील जमा झाले नाहीत. एवढेच नाही, तर मोदी सरकारने चौकीदाराचे नाव देखील बदनाम केले, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
नगर व शिर्डी मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप व भाऊसाहेब कांबळे यांच्या विजय संकल्प सभेत मुंडे बोलत होते.
‘एकीकडे आई-वडिलांचा व जनतेचा आज्ञाधारक संग्राम आहे व दुसरीकडे कुपुत्र आहे. त्याचे नाव ‘सु’जयऐवजी ‘कु’जय ठेवायला हवे होते, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी सुजय विखे यांच्यावर टीका केली.
इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. दक्षिणेत आजोबा पडले होते. आता आता नातूही पडणार, असा दावाही त्यांनी केला.
क्लेरा ब्रूस मैदानावर पार पडलेल्या या सभेला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे, अंकुश काकडे, आमदार वैभव पिचड, अरुण जगताप, राहुल जगताप, सुधीर तांबे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, ज्येष्ठ नेते दादा कळमकर
माजी आमदार पांडुरंग अभंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नीलेश लंके, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, आशुतोष काळे आदी मान्यवर उपस्थित होते. जगताप