गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्यास तुम्हाला सहा लाख रुपये मिळतात हे तुम्हाला माहिती आहे काय?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अशा बर्‍याच योजना आहेत ज्यांची तुम्हाला कल्पनाही नसते. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा अनेक योजनांपासून दूर राहावे लागते .

गॅस सिलिंडरमुळे एखादा अपघात झाल्यास तुम्हाला सहा लाख रुपये मिळतात हे तुम्हाला माहिती आहे काय? सिलिंडरवर 6 लाख रुपयांचा विमा संरक्षण उपलब्ध आहे, जो अपघात झाल्यास दिला जातो.

आज बहुतेक घरांमध्ये गॅस सिलिंडर वापरला जातो. परंतु 6 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे संरक्षण फारच कमी लोकांना माहित आहे. घरात गॅस सिलिंडरमुळे एखादा अपघात झाल्यास तेल कंपनीकडे विम्याचा दावा केला जाऊ शकतो.

आपल्या घरात गॅस कनेक्शन बसविण्याच्या पहिल्या दिवसापासून हे विमा संरक्षण प्रारंभ होते. अशी करा प्रक्रिया – एखादा अपघात झाल्यास प्रथम आपल्या एलपीजी वितरकास त्याविषयी कळवा.

ते वितरक तेल कंपनीशी संलग्न विमा कंपनीला सूचित करतील. विमा कंपनी अपघात भागाची पाहणी करेल आणि नंतर भरपाईची रक्कम निश्चित करेल.

एकूण नुकसान भरपाईची रक्कम तेल कंपनी देईल. एलपीजी वितरकाला विमा रक्कम पाठविली जाईल जी ती ग्राहक किंवा त्याच्या कुटुंबाकडे देईल.

  • – आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवा
    – गॅस वितरकला एफआयआरची एक कॉपी द्या
    – गॅस वितरक ही सूचना तेल कंपनीला सांगेन
    – ऑयल कंपनी रजिस्टर्ड इंश्योरेंस कंपनीला  डिटेल माहिती देईल.
    – विमा कंपनी चौकशीसाठी एक टीम पाठवेल
    – ही  टीम आपला रिपोर्ट सादर करेल
    – एलपीजी वितरकाला विमा रक्कम पाठविली जाईल जी ती ग्राहक किंवा त्याच्या कुटुंबाकडे देईल.
    – दुर्घटनेत मृत्यू झाल्यास 6 लाख रु, जखमी झाल्यास  2 लाख रु आणि संपत्तीच्या नुकसानीसाठी 2 लाख देते.
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24