अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर : सोशल मिडियात कोरोना आजारासंदर्भात खोटा मेसेज पाठवून अफवा पसरविणाऱ्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताहिर शेख (रा.मुकूंदनगर,नगर) याने त्याच्या मोबाईल नंबरवरून कोरोना आजारासंदर्भात एका ग्रुपवर मुकूंदनगर, फकिरवाडा भाग मिलिटरीच्या ताब्यात देणार
असून याबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी तसेच मिलिटरी काही सरकारी अधिकाऱ्यांसह परिसरात फिरत असून घरातील लोकांचे नाव व मोबाईल नंबर त्यांना देवू नका,
असा खोटा आशयाचा मेसेज पाठवून अफवा पसरविल्याने तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना संसर्ग आजारा संदर्भात सोशल मिडियात निराधार, अफवा असलेली माहिती प्रसारीत करु नये असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी केले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com