अहमदनगर : जामखेड तालुक्यातील जमादरवाडी शिवारातील पेट्रोल पंपावरील जमिनीत असलेल्या टाक्यांमधील २ हजार ५९२ डिझेल व ७४ लिटर पेट्रोल, असे एकूण एक लाख ८१ हजार ४७९ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील जामखेड खर्डा रोडवर समर्थवाडी शिवारात केसर कंपनीचा कोल्हे पेट्रोल पंप आहे.
जमिनीत पेट्रोलच्या टाक्या काढलेले आहेत. दि.१७ ते १८ डिसेंबर दरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी या टाक्यांमधून एक लाख ८१ हजार ४७९ रुपयांचे २ हजार ५९२ लिटर डिझेल व ७४ लिटर पेट्रोल असा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत इस्सार कंपनीच्या कोल्हे पेट्रोल पंपाचे मॅनेजर सतिश मारुती कोल्हे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.