मुळा धरणातून ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- pमुळा धरणातून मुळा नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सोमवारी सकाळी १ हजार क्युसेकने करण्यात आला. रविवारी नदीपात्रात ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

१ सप्टेंबरला मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने मुळा धरणातून मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यातील चार दिवस पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला होता.

गेल्या ४५ दिवसांत मुळा धरणातून नदीपात्रात १४ हजार ६१९ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला. मुळा उजव्या कालव्यातून २५० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे.

धरण तांञिकदृष्ट्या भरल्यापासून सोमवारपर्यंत उजव्या कालव्यातून ११०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत राहुरी २८ मिलीमीटर, मुळानगर ९ मिलीमीटर, वांबोरी २२ मिलीमीटर,

कोतूळ १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठ्याची २६ हजार दशलक्ष घनफूट नोंद झाली होती. कोतूळकडून मुळा धरणात अवघी १९४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

धरणाच्या नगर, संगमनेर, पारनेर या कमांड एरियात झालेल्या पावसाचे धरणात जमा होणारे पाणी मुळा नदीपात्रात सोडले जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24