संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर मृत कुत्र्याची विल्हेवाट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवावर खेळून नागरिकांना आरोग्यसेवा देणार्‍या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकांचेच आरोग्य धोक्यात आले होते.

मागील आठ दिवसापासून मेलेला कुत्रा आरोग्य सेविकांच्या वसतीगृहाच्या आवारात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.

या परिसराची संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी पहाणी करुन तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मेलेल्या कुत्र्याची विल्हेवाट लावण्यात आली.

जिल्हा रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आरोग्य सेविकांचेच आरोग्य धोक्यात आले होते. याची दखल घेत हा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (१४ ऑक्टोबर) रोजी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

तर मेलेल्या कुत्र्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली. जिल्हा रुग्णालयातील आवारात यापुढे हलगर्जीपणा केल्यास संबधित अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सोमनाथ गायकवाड, राजू आंग्रे, सादिक शेख आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24