इम्रान खान यांना पंतप्रधान पदासाठी अपात्र ठरवा!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अपात्र घोषित करण्यासाठी लाहोर उच्च न्यायालयात शनिवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयविरोधी वक्तव्य केल्यावरून खान यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

न्यायालयाचा अवमान झाल्यावरून ताहिर मकसूद यांनी लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्व्वोच न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांविरोधी वक्तव्य केले आहे.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्येसुद्धा न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस खान यांना धाडली होती.

खान यांच्या सततच्या न्यायालयविरोधी वक्तव्यामुळे त्यांना अपात्र घोषित करून त्यांचे नॅशनल ॲसेम्ब्लीचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

उल्लेखनीय म्हणजे खान सरकारने भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा भोगत असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना उपचारासाठी परदेशात जाऊ देण्यासाठी ७०० कोटी रुपयांचे बॉण्ड जमा करण्याची अट ठेवली होती; परंतु न्यायालयाने खान सरकारची बॉण्डची अट उलटवली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24