जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांना ‘त्या’ प्रकरणात दिलासा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- तहसीलदार ज्योती देवरे यांना फोनवर अश्लिल संभाषण, पन्नास हजारांची खंडणी मागणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे

यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनास ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. झावरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे अटक न करता त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्या वकिलाने नगरच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. मंगळवारी निर्णय होणार होता. मात्र, न्यायालयाने अंतरिम जामिनास ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24