अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी इच्छूक उमेदवारांनी १५३ अर्ज नेण्यात आले आहे.
दरम्यान निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 2 लाख रुपयांची निवडणूक खर्च मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर दिली.
निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी या अटी पाळाव्यात संस्थेच्या अंतिम मतदार यादीतील मतदारांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस उमेदवार प्रतिनिधी म्हणून काम करता येणार नाही.
नामनिर्देशन पत्रावर उमेदवारांच्या रंगित फोटोची सक्ती करण्यात आलेली आहे. उमेदवारांना अर्ज छाननीच्या वेळी आक्षेप घ्यावायचा असल्यास तो लेखी स्वरूपात आणि पुराव्यसह दाखल करणे आवश्यक राहिल.
जिल्हा बँकेसाठी निवडणूक लढविणार्याा उमेदवारांना बँकेत खाते उघडून त्याव्दारे निवडणूक खर्च करावा लागणार आहे. तसेच त्याच्या खात्याचा संपूर्ण तपशील निवडणूक अधिकार्यांना सादर करावा लागणार आहे