भाजप सरकार हे जनतेच्या हिताचे -जिल्हाध्यक्ष मुंडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा :- भाजप चे केंद्रातील सरकार हे जनतेच्या हिताचे सरकार असून राष्ट्रीय नागरिकत्व कायदा हा सर्वांच्या फायद्याचा आहे पण काँग्रेस व आघाडीचे सरकार हे भाजप च्या विरोधात रान उठवत आहेत असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून अरुण मुंडे यांचा श्रीगोंदा येथे भाजप च्या वतीने सत्कार करण्यात आला.

 यावेळी बोलताना नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले श्रीगोंदा तालुका हा अतिशय चांगला तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात राज्याला मार्गदशर्न करणारा तालुका आहे या तालुक्यात माजी मंत्री बबनराव  पाचपुते यांच्या कार्याचे मोठे कर्तृव आहे. 

सध्या देशात भाजपचे सरकार असून नागरिकत्व कायदा आणला आहे हा कायदा सर्वांच्या फायद्याच आहे पण काँग्रेस व आघाडी सरकार हे चुकीचा प्रचार करत आहेत व भाजप च्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे प्रतिपादन नूतन जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले. यावेळी आमदार बबनराव पाचपुते,जि.प.सदस्य सदाशिव पाचपुते,  युवा नेते विक्रमसिंह पाचपुते,जेष्ठ नेते  पोपटराव खेतमाळीस, दिनकर पंधरकर, 

बाळासाहेब  महाडिक, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उपनगराध्यक्ष अशोकराव खेंडके, बापुतात्या गोरे, शहाजी खेतमाळीस, दत्तात्र्य हिरनावळे, दिपक शिंदे, राजेंद्र उकांडे, नंदकुमार कोकाटे, सतीशशेठ पोखरणा, संतोषराव खेतमाळीस, एम डी शिंदे, दत्ताजी जगताप, adv.विवेक नाईक,  शहाजी हिरवे, मारुती औटी, संग्राम पवार, रविंद्र म्हस्के, नितीन नलगे आदी सह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

 

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24