अहमदनगर ब्रेकिंग : खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ! पोलीस ठाण्यासमोर ठेवला मृतदेह,खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Breaking : कर्जत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून फिर्याद देण्यासाठी आलेल्या लोकांवरच गुन्हा दाखल करण्याची भाषा केल्यानंतर मयत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी कर्जत पोलीस स्टेशनसमोरच मृतदेह ठेऊन आवारात ठिय्या दिला.

काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करून गुन्हा दाखल करून घेण्याची तयारी दाखवल्यानंतर उपस्थित लोकांचा संताप शांत झाला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चर्गवाडी येथील सोनाली दीपक पांडुळे (वय ३५), या महिलेने दि. १९ नोव्हें. रोजी सकाळी ७ च्या अगोदर फाशी घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, या महिलेच्या माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीचा खून झाल्याचा आरोप केला होता व तशी खबर कर्जत पोलीस स्टेशनला दिली होती.

मयत विवाहित महिलेचा मृतदेह ससून हॉस्पिटल मध्ये नेऊन तेथे शवविच्छेदन करण्यात आले व दि. २० नोव्हें, रोजी दुपारी कर्जत पोलीस स्टेशन येथे मयताच्या पतीसह इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली होती.

पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्याबरोबर बोलताना नातेवाईकांनी संवाद साधला. गुन्हा दाखल न केल्यास मृतदेह पोलीस स्टेशनसमोरच ठेवण्याचा इशारा देत पोलीस स्टेशनसमोर अॅब्युलन्स उभी करून शंभरच्या आसपास महिला पुरुषांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

मयताचा भाऊ गौरव महादेव झिजे, (वय २३), रा. झिजेवाडी, ता.कर्जत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयताची सासू नंदाचाई अंचादास पांडूळे, सासरे अंबादास बलभिम पांडुळे, पती दिपक अंबादास पांडुळे, व इतर दादा अंबादास पांडुळे, शोभा दादा पांडुळे, ननंद रेखा तुकाराम पांडुळे, सर्व रा बर्गेवाडी, ता. कर्जत यांच्यावर ३०२ सह इतर कलमामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत महिलेच्या मानेवर मोठी जखम असल्याने नातेवाईकांना खुनाचा संशय व्यक्त केला आहे. मयत महिलेने माहेराहून घर चांधण्यासाठी पैसे न आणल्याने तसेच दुसऱ्याच्या येथे मजुरीने कामाला जात नसल्याने आरोपींनी महिलेचा खून करून तिने फाशी घेतल्याचा बनाव केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.