अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : चिकनमध्ये करोनाचा विषाणू ही अफवा आहे. यामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
यासंदर्भात जनजागृती करण्यात येत असून, तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फतही ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. चीनमध्ये करोना विषाणूच्या बाधेमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले. मात्र, विविध माध्यमांतून करोना विषाणूचा प्रादुर्भाव चिकनमुळे होत असल्याचा चुकीचा प्रसार केला जात असल्याचे निदर्शनास आले.
त्यावर पोल्ट्री व्यावसायिकांनी अशा चुकीच्या प्रसारामुळे नुकसान होत असून, याबाबतची वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी, अशी विनंती केली होती. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भात आवाहन करून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
आपल्याकडे कोणतेही मांस शिजवल्यानंतर खाण्यात येते. शिजवलेल्या अन्नात कोणताही विषाणू जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवण्यात येत आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले. कोब्यांचे मांस खाल्ल्यास करोनाचा धोका आहे, ही पूर्णपणे अफवा आहे. नागरिकांनी याविषयी मनात असलेला संभ्रम दूर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com