अफवांवर विश्वास ठेवू नका : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :-  कोरोना तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने सर्वांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

थोरात म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, त्याचबरोबर गर्दी टाळणे व विनाकारण घराबाहेर पडणे टाळणे अत्यावश्यक आहे.

या नियमांचे पालन केले तर आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो. मागील दीड महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन असून सरकार, प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य कर्मचारी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी अत्यंत सेवाभावीपणे काम करत आहेत.

या सर्वांना सहकार्य करणे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपण घरीच थांबलो, तर त्यांच्यावरील ताण कमी होईल. संगमनेर तालुक्यात व शहरात काही रुग्ण आढळले आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्ण आढळलेल्या भागात हॉटस्पॉट जाहीर करून लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. काही भाग सील केले आहेत.

मात्र, सोशल मीडियातून अफवा पसरवल्या जात असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे थोरातांनी सांगीतले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24