अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- कर्जत तालुक्यातील खर्डा येथे विकासाचे मोठे व्हिजन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे १० सदस्य निवडून आले आहेत.
तुमच्यात गटबाजी होऊ देऊ नका आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपण नंतर एकत्रित ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांची बैठक घेऊ. सरपंच व उपसरपंच पदासाठी योग्य तो निर्णय घेतला ज़ाईल.
तसेच सरपंच पदाच्या निवडणुकीत कोणीही गटबाजी करू नये, विकास कामांना निधी देण्याचे काम माझ्यावर सोपवा, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
खर्डा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले कि, पुढील पाच वर्षे खर्डा गावाच्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जाईल.
यामध्ये खड्र्याला सात कोटी रुपयांचा नवीन पाणीपुरवठा योजना, श्री संत गीते बाबा गडाच्या माध्यमातून होणारा विकास, कौतुका नदीचे सुशोभिकरण, खर्डा किल्ल्यासमोर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे,
खर्डा एसटी स्टँडशेजारील जागेत बेरोजगार तरुणांना गाळे वाटप, खादी ग्रामउद्योग प्रकल्पातून महिला व बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. खर्डा मार्केट कमिटीच्या पटांगणात वेअर हाऊसचे गोडाऊन होणार आहे.
खर्डा बसस्थानकाशेजारी शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच खर्डा शहरातील वीज,रस्ते, गटार योजना आदी कामांसाठी येत्या पाच वर्षात मोठा निधी देणार असल्याचे सांगितले.