अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-साईकृपा हिरडगाव हा पाचपुते यांच्या मालकीचा साखर कारखान्याकडे शेतकरी यांचे ऊसाचे पेमेंट थकबाकी आहे. यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली आहेत तरी सुद्धा विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडून कोणतीच हालचाल होत नाही.
या पूर्वी टिळक भोस व त्यांच्या सहकारी व शेतकरी यांनी पाचपुते यांच्या (माऊली) निवास्थानासमोर श्रीगोंदा येथे 99 दिवस ठिय्या आंदोलन केले होते.त्यावेळी काही शेतकऱ्यांचे पेमेंट मिळाले होते मात्र अनेक शेतकरी, वाहतुकदारांचे व कामगारांचे आज रोजी करोडो रुपये येणे बाकी आहे साईकृपा हिरडगाव कारखान्यावर साखर आयुक्त यांनी RRC ची कारवाई केली आहे.
तसेच या पूर्वी या कारखान्याची प्रतिकात्मक जप्ती सुद्धा केलेली आहे. साईकृपा हिरडगाव कडुन श्रीगोंदा कर्जत आष्टी शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची थकबाकी आहे. यापूर्वी मुंडन आंदोलन, जागरण गोंधळ आंदोलन, उपोषणे अशी अनेक आंदोलने शेतकऱ्यांनी केली आहेत.
शेतकऱ्यांबरोबरच अनेक बँकांची थकबाकी असून बँकानी देखील कारवाई केली आहे. त्यात यंदा मोठ्या अडचणीतून विक्रम पाचपुते यांनी हा कारखाना आठ दिवसांत सुरू करणार असे या पूर्वी जाहीर केले आहे.
तशी पूर्व तयारी सुद्धा त्यांनी केली आहे. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व संभाजी ब्रिगेड नगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे भेट घेवून.
साईकृपा हिरडगाव च्या विरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला आहे. त्यावर साखर आयुक्त यांनी जिल्हाधिकारी सुधाकर भोसले यांना फोन करून , तसेच तहसीलदार प्रदीप पवार यांना तातडीने लिलावाची प्रक्रिया पूर्ण करा अशा सूचना दिल्या असल्याचे नाहाटा/भोस यांनी सांगितले.
तसेच व मागीलसर्व थकबाकी न दिल्यास या वर्षी गळीत हंगामास परवानगी देऊ नका अन्यथा आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे साईकृपा हिरडगाव चा गळीत हंगाम सुरू करणेसाठी शर्थीने प्रयत्न करणारे विक्रम पाचपुते व राजकुमार ढमढेरे यांसमोर साईकृपा हिरडगावचा गळीत हंगाम सुरू करणेचे आव्हान उभे झाले आहे.
साईकृपा हिरडगाव कारखण्याकडून FRP ची रक्कम येणे असल्याने त्यांना गाळप परवाना देऊ नका अशी रास्त मागणी साखर आयुक्त गायकवाड यांकडे केली आहे. तरीही साईकृपा चालू झांल्यास साखर आयुक्त कार्यलयात आत्मदहन आंदोलन करू, मात्र शेतकऱ्याचे पेमेंट मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा नाहाटा-भोस यांनी दिला.