डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ढोकणे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या नूतन पदाधिकारी निवडी संदर्भातील बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत अध्यक्षपदी नामदेवराव ढोकणे यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढूस तसेच स्वीकृत संचालकपदी सुभाष वराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर बैठक कारखाना कार्यस्थळावरील सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी रामेंद्र कुमार जोशी यांच्या अधिपत्याखाली, खा.डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.

चार वर्षांपूर्वी विखे यांचे निष्ठावंत असणारे अ‍ॅड. सुभाष पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांना अध्यक्ष तर शामराव निमसे यांना उपाध्यक्ष करून युवा नेतृत्वाला संधी दिली होती.

निवडणूक कालावधीमध्ये तत्कालीन आमदार व जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी निवडून येणार्‍या संचालक मंडळास जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा शब्द दिला होता.

त्यानुसार त्यांनीही गेल्या चार वर्षांपासून जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखाना संचालक मंडळाला मोठे सहकार्य केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे सदर निवडणूक घेण्यात आली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24