डॉ. वंदना मुरकुटे यांची पंचायत समितीच्या सभापती पदी वर्णी लागणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : पुढील अडीच वर्षांसाठी पं. स. सभापतिपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने टाकळीभान गणातील डॉ. वंदना मुरकुटे यांची या पदी वर्णी लागणार आहे.

पंचायत समितीत चार महिला तर चार पुरुष सदस्य आहेत. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दोन्ही गटांचे चार सदस्य निवडून आले.

सभापतिपद खुले असल्याने चिठ्ठी टाकून दीपक पटारे यांची लॉटरी लागली. आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण निघाला.

टाकळीभान गणातील डॉ. मुरकुटे याच प्रवर्गातून निवडून आल्या असल्याने सभापतिपदी त्यांची वर्णी लागणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24