निवडी रखडल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते झाले सैरभैर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  श्रीरामपूर तालुका व शहरा काँग्रेस समितीची कार्यकारिणी घोषित झालेली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे आदींना निमंत्रणे देता येत नाहीत.

परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून अनेक कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. तालुका व शहर काँग्रेस समितीच्या पदाधिकारी निवडी अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत.

त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. कोरोनाच्या संचारबंदीत शिथिलता आली असल्याने लवकरच निवडी होऊन आपली प्रमुख पदावर वर्णी लागेल अशी अपेक्षा कार्यकर्ते बाळगून आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बाळासाहेब साळुंके यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली.

तर अरुण नाईक यांची तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. संजय छल्लारे यांची शहराध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मात्र विधानसभेच्या निवडणुुका पार पडून सहा महिने उलटून गेले आहेत.

तरीही तालुका व शहराची कार्यकारिणी घोषित झालेली नाही. पक्षांतर्गत कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे आदींना त्यामुळे निमंत्रणे देता येत नाहीत. निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

आमदार लहू कानडे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्याशी चर्चा करुन लवकरच निवडी होतील अशी अपेक्षा तालुकाध्यक्ष अरुण नाईक यांनी व्यक्त केली.

शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी पक्षाची समिती, पदाधिकारी व कार्यकारिणी अस्तित्वात आलेली नाही. संचारबंदी शिथिल झाल्यामुळे सर्व काही व्यवस्थित पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24