निवडणुकांमुळे ‘या’ तालुक्यात वाहतोय दारूचा पूर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- राज्यातील १४ हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. मटण, दारूचे आमिष दाखवून निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीसाठी सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदार राज्याला खुश करण्यासाठी उमेदवाराकडून वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत.

अशा गैरप्रकार पाहून नागरीकातून संताप व्यक्त होत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ११७ ग्रामपंचायती पैकी ५९ ग्रामपंचायतीचा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आला असून

मतदार राज्याला खुश करण्यासाठी रोज सायंकाळी हजारो लिटर सोमरस तसेच पूर्व भागातील अनेक ग्रामपंचातीच्या निवडणुकीत रोज हजारो लिटर सोमरस तसेच शेकडो बोकडाचा बळी देऊन

मतदार राज्याला खुश करण्यासाठी सोमरस यांच्यासह यथेच्छ मटणाच्या भोजनावळी अगदी दररोज न चुकता चालू आहेत मतदार राजा कोणताही वार दिवस न पाहता मोठ्या प्रमाणात सोमरस प्राशन करून मटणावर ताव मारताना दिसून येत आहेत.

याबाबत अनेक गावातील सजग नागरिकांनी निवडणूक आयोग तसेच श्रीगोंदा तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणताच फायदा झाला नाही.

दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा दारूमुक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी महिलांनी पुढाकार घेतला आहे.

गावाच्या विकासासाठी दारूमुक्त निवडणूक आवश्यक आहे. निवडणूक काळात दारूचे वाटप झाल्यास दारूविक्री बंद असलेल्या गावातसुद्धा दारू सुरू होण्याची शक्यता आहे. दारूचे आमिष दाखवून निवडून येणारा उमेदवार गाव विकासात अडचण निर्माण करू शकतो. यामुळे महिला वर्ग आक्रमक झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24