अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- गुरुवारी औरंगाबाद – पुणे या महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत ही वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळविण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठा मोर्चा निघाले. विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. या आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली.
या घटनेला गुरुवारी (दि. २३ जुलै) दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी मराठा मोचार्चे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे हा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे. वाहतूक कोंडी व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद – पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण,
शेवगांव मार्गे वळ सदरील आदेश शासकीय वाहने अंबुलन्स व आपत्कालीन वाहने यांना लागू राहणार नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com