अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर येथे फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने माजी आमदार तथा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला.
शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने चार दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर परिसरात देवस्थानचे पुजारी व कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करताना, तसेच माकड व इतर जनावरांना बिस्किटे, केळी, फरसाण देत असताना राठोड यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळला नाही.
त्याचबरोबर त्यांनी जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन केले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी भगवान सानप यांच्या फिर्यादीवरून राठोड यांच्यासह
शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, गिरीश जाधव, मदन आढाव, मनीष गुगळे, सतीश चोपडा, विशाल वायकर व मंदार मुळे यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews