वर्षभरात अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठीकाणाहून झाले तब्बल ८८ व्यक्ती बेपत्ता !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला रोज हजारो भक्त भेट देतात. प्रत्येक गुरुवार, सणाला, वर्षाच्या सुरुवातीस-शेवटी इथे लाखोंची गर्दी जमते. साईंवरील श्रद्धेपोटी हे भाविक साई संस्थानाला भरभरून दान देखील देतात.

दरवर्षी इथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान आलेल्या भाविकांमधून बेपत्ता होणाऱ्यांचे वास्तव देखील समोर आले आहे. मोठ्या शिर्डीत २०१८ मध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून ८८ भाविक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

इंदौर येथील साईभक्त मनोजकुमार सोनी यांनी मिळविलेल्या माहितीच्या अधिकारातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.ऑगस्ट २०१७ मध्ये मनोज सोनी पत्नी आणि मुलांसह साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते.

साई प्रसादलयातून भोजन केल्यानंतर त्यांची पत्नी तिथून हरवली होती. त्यानंतर १० महिन्यांत ८८ व्यक्ती शिर्डीतून गायब झाल्याची नोंद शिर्डी पोलीस ठाण्यात आहे.

यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. हरवलेली व्यक्ती सापडली की नाही याची माहिती नातेवाईक कळवत नाहीत. तसेच बेपत्ता लोकांचा मानवी तस्करीसाठी वापर झाल्याची तक्रार आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अहमदनगर लाईव्ह 24