पार्थ पवारांविषयी खा. डॉ. सुजय विखे म्हणतात …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही.

तो अप्रगल्भ आहे.’ असे म्हणत फटकारले होते. यानंतर अनेक राजकीय रंग दिसू लागले. भाजपच्या काही नेंत्यानी यावरून पार्थ यांची बाजू उचलून धरली. आता खा. सुजय विखे यांनी देखील पार्थ पवारांविषयी वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबतचा विषय त्यांचा घरगुती आहे. त्यामुळे यावर बोलायचं विषयच येत नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही असे ते म्हणाले.

शिर्डी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना खा. विखे यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी यावेळी खासदार संजय राऊतांचे वक्तव्य निंदनीय आहे.

त्यामुळे संजय राऊतांनी डॉक्टरांची माफी मागावी. डब्ल्यू एचओ आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही, असा प्रश्न विचारात खा. सुजय विखेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी, आ.रोहित पवार यांनी पार्थ पवार यांचे वक्तव्य आणि त्यावर शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया हा विषय आमच्या कुटुंबातील आहे. यात अन्य कुणी पडण्याचे कारण नाही, असे फटकारले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24