अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : जुन्या वादाचा मनात राग धरून एकाने तिघा चुलत भावांना लाकडी दांडके व कोयत्याने वार केल्याची घटना अकोले तालुक्यातील वारंघुशी गावात घडली आहे.
याबाबत दांडके व कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या पैकी आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. वारंघुशी गावात गणेश घाणे हा विठ्ठल मंदिरासमोर असताना किशोर विठ्ठल लोटे तेथे आला.
तू एक वर्षापूर्वी माझा चुलत भावाशी भांडण केले होते, असे म्हणाला असता गणेश घाणे समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन आठ जण गणेशला शिवीगाळ व मारहाण करू लागले.
तेव्हा गणेशने आरडाओरडा केल्याने त्याचा चुलत भाऊ तेथे गेले. यात सिद्धेश रामचंद्र घाणे यांच्या डोक्यास लाकडी दांडक्याने व शंकर रामचंद्र घाणे यांच्या डोक्यास काठीने व प्रकाश भाऊराव घाणे यांच्या डाव्या भुव ईजवळ व नाकावर झटपटीत कोयता लागून दुखापत झाली, अशी फिर्याद गणेश घाणे यांनी राजूर पोलिसांत दिली.
याप्रकरणी राजूर पोलिसांनी दादाभाऊ पांडुरंग लोटे, किशोर पांडुरंग लोटे, विठ्ठल पांडुरंग लोटे, निरंकार पांडुरंग लोटे, प्रविण विठ्ठल लोटे, बिवेक लोटे, सुदर्शन लोटे, दौलत लोटे (सर्व रा. वारंघुशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews