अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.
दरम्यान या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी निवडणूक या बिनविरोध झाल्या, यापैकी नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव ग्रामपंचायतीच्या 9 जागांपैकी एक जागा बिनविरोध निवडून आली असून उर्वरीत 8 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत.
निपानीनिमगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. एक मधील सत्ताधारी प्रगती जनसेवा पॅनलच्या उमेदवार पुजा वैजनाथ जाधव या बिनविरोध निवडून आल्या. उर्वरित 8 जागेसाठी मतदान घेण्यात येणार आहे.