निवडणूक रणांगण ! 28 ग्रामपंचायतींसाठी 186 अर्ज दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-अहमदनगर राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नेवासा तालुक्यातील 72 गावांच्या 59 ग्रामपंचायतींच्या 591 जागांसाठी 15 जानेवारीला होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या तिसर्‍या दिवशी 34 गावांच्या 28 ग्रामपंचायतींसाठी 186 अर्ज दाखल झाले.

तिसर्‍या दिवसअखेर एकूण 204 अर्ज दाखल झाले आहेत. 38 गावांच्या 31 ग्रामपंचायतींसाठी कालअखेर एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याचे शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत.

त्यामुळे या दिवसात अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी उसळणार आहे. एकही अर्ज दाखल न झालेल्या 31 ग्रामपंचायती बहिरवाडी-धामोरी ग्रुप ग्रामपंचायत, बाभुळवेढे उस्थळदुमाला ग्रुप ग्रामपंचायत, बोरगाव-सुरेगाव गंगा ग्रुप ग्रामपंचायत,

पिंप्रीशहाली-गोयगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत, माळेवाडी दुमाला-सुरेगावतर्फे दहिगाव-वरखेड ग्रुप ग्रामपंचायत, मांडेगाव्हाण-मोरगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत, बर्‍हाणपूर, बेल्हेकरवाडी, भालगाव, दिघी, गळनिंब, गेवराई,

घोगरगाव, कारेगाव, लांडेवाडी, लोहगाव, मंगळापूर, मोरयाचिंचोरे, नजिकचिंचोली, नवीन चांदगाव, निंभारी, निपानीनिमगाव, पाचुंदे, पुनतगाव, रामडोह, रांजणगाव, शिंगणापूर, सुलतानपूर, तेलकुडगाव, उस्थळखालसा, वांजोळी.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24