अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील महत्वाच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल चौथ्या दिवशी ऑनलाईन 20 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे दाखल अर्जांची संख्या आता 52 वर पोहचली आहे.
टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आ. लहु कानडे, माजी आ. भानुदास मुरकुटे व माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांच्या लोकसेवा महाविकास आघाडीकडुन 11 इच्छुकांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.