अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वांबोरी ग्रामपंचायतीमध्ये एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
स्थानिक पातळीवर पारंपरिक विरोधक समजले जाणारे डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांचा गट या निवडणुकीत पुन्हा आमने-सामने दंड थोपटून उभा आहे.
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी अध्यक्ष अॅड. सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 14 जागा मिळाल्या होत्या.
तर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या गटाला तीन जागेवर समाधान मानावे लागले. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकूण 17 जागेसाठी निवडणूक होणार आहे.
त्यामध्ये पाच प्रभागांमध्ये 15 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये दोन उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
भागनिहाय मतदान संख्याः
एकूण मतदार संख्या 14 हजार 441 असून त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागणार आहे.