अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ 21 जागेसाठी पंचवार्षिक निवडणूकी साठी 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
दि.6 जानेवारी रोजी झालेल्या छाननी मध्ये 282 पैकी 135 अर्ज पात्र तर 147 अर्ज अपात्र ठरले होते. नवीन संचालक मंडळात 11 नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर, जुन्या 10 चेहऱ्यांची वर्णी लागली आहे.
बिनविरोध निवडून आलेले संचालक : शेवगाव गट- सुधाकर नरवडे, पंडित भोसले. शहरटाळकी गट- नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले. नेवासा गट- विठ्ठलराव लंघे, काकासाहेब शिंदे, गोरक्ष गंडाळ.
ढोरजळगाव गट- मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे. कुकाणा गट- पांडुरंग अभंग, नारायण म्हस्के. वडाळा गट- भाऊसाहेब कांगुणे, जनार्दन कदम, शिवाजी कोलते.
अनु. जाती/जमाती मतदारसंघातून दीपक नन्नवरे. महिला प्रतिनिधी ताराबाई जगदाळे, रत्नमाला नवले. भटके-विमुक्त मतदारसंघातून- लताबाई मिसाळ.