महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीवरुन राजकीय खल सुरु झाला असून, शिवसेना उमेदवार योगीराज गाडे यांना माघारीसाठी मुंबईतून आदेश आल्याची माहिती खास सूत्रानी दिली .

रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये झालेल्या शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गाडे यानी आता अर्ज मागे घेतलण्यास ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीवरुन राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसने मोठी खेळी करत भाजपच्या मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांचा अर्ज दाखल केलाय.

भाजपशी थेट हातमिळवणी टाळण्यासाठी राष्ट्रवादीने ही खेळी केल्याची चर्चा असून आ. संग्राम जगताप यांचे समर्थक असलेले मनोज कोतकर हे मनपा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजयी झालेले आहेत.

मात्र सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. अहमदनगरमध्ये भाजपशी थेट आघाडी केली तर राज्यात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीने मनोज कोतकर यांच्या हातात घड्याळ बांधून त्यांना सभापतीपदाची संधी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24