महापालिका कर्मचारी पतसंस्थेत 45 लाखांचा अपहार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- कितीही उपाययोजना केल्या तरी भ्रष्टाचार मात्र थांबायचे नाव घेत नाही. भ्रष्टाचार हा भारतीय व्यवस्थेला लागलेली कीड आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अहमदनगरमध्येही अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार अनेकदा उघडकीस आलेला आहे. आता पुन्हा नव्याने महापालिका कर्मचारी पतसंस्थेत वस्तू कर्जवाटपात 45 लाख रुपयांचा अपहार झाला असल्याचे समोर आले आहे.

सभासदांची फसवणूक करणार्‍या चेअरमन, व्हाईस चेअरमन व संबंधित ज्वेलर्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्या सभासदांनी केली आहे.

त्या आशयाचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले आहे. सभासदांनी असा आरोप केला आहे कि, पतसंस्थेत सरसकट सर्व वस्तू कर्ज संबंधित ज्वेलर्स यांच्याकडे घेण्याची सक्ती केली.

मंजूर कर्ज 90 हजारांपैकी 13 हजारांची कपात करून सभासदांना 77 हजार रोख दिले गेले. मंजूर रकमेतील 13 हजार रुपये कशाचे वजा केले याची विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास नकार देण्यात येत आहे.

सोन्याच्या वस्तूवर जीएसटी कर हा 3 टक्के असून 90 हजारांवर 3 टक्के प्रमाणे 2 हजार 700 रुपये होत आहे. तसे न करता संस्थेचे चेअरमन आणि व्यवस्थापक व व्हाईस चेअरमन यांनी संगनमताने सभासदांची

प्रत्येकी 13 हजार रुपयांची आर्थिक लूट केली. या प्रकरणात चेअरमन व व्हाईस चेअरमन व ज्वेलर्सचे मालक यांनी सभासदांची फसवणूक करून सुमारे 35 ते 45 लाख रुपये रकमेचा अपहार केला असल्याचा आरोप सभासदांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24