ब्रेकिंग

Ahmednagar Breaking : लग्न होऊनदेखील पत्नीचा नाद सोडून दे, नाहीतर तुझा मर्डर करु ! सासूरवाडीच्या छळास कंटाळून पतीने केली आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : लग्न होऊनदेखील पत्नीचा नाद सोडून दे, नाहीतर तुझा मर्डर करु, अशा धमक्या देत सासूरवाडीकडील लोक पत्नीस नांदायला पाठवत नव्हते व पत्नी देखील सासरी यायला नकार दिला. अखेर याच त्रासाला कंटाळून पतीने मोबाईलवर आत्महत्येचे स्टेटस ठेऊन सासूरवाडीकडील लोकांच्या विरोधात आत्महत्या करत असल्याची चारापानी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी मयताचे चुलते पोपट रामभाऊ जाधव (वय ४२) वर्षे, रा. नायगाव, ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासूरवाडीकडील सविता कैलास जाधव, कैलास जाधव, विलास कैलास जाधव, बालाजी कैलास जाधव, लताबाई कैलास जाधव व कविता गणेश किलमिस ( कविता कैलास जाधव) सर्व रा. दौंडाचीवाडी, ता. जामखेड अशा सहा जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला आत्महतेस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादीचा मयत पुतण्या हरिश्चंद्र राजेंद्र जाधव व त्याची पत्नी सविता कैलास जाधव यांचे लग्नापूर्वी चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यातून दोघांचे लग्न करण्याचे ठरले होते.

मात्र, लग्नापूर्वीच हरिश्चंद्र व कविता यांना एक मुलगा झाला. ही बाब सासूरवाडीच्या लोकांना माहीत होती. त्यामुळे त्या दोघांचे पुन्हा लग्न करण्याचे ठरले. मात्र बराच काळ उलटूनही व लग्नाआधीच दोघांना मुलगा होऊनही मुलीचे वडील कैलास जाधव यांनी त्या दोघांचे लग्न लावून देण्यास टाळाटाळ केली.त्यामुळे या दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाह केला.

हीच गोष्ट सासूरवाडीकडील मुलीच्या नातेवाईकांना खटकली त्यामुळे मयत हरिश्चंद्र यास सासूरवाडीचे लोक तू तुझ्या पत्नीचा नाद सोड, नाहीतर तुझा मर्डर करू, अशा वारंवार धमक्या देत होते व पत्निनिदेखील सासरी नांदायला येण्यास नकार दिला होता.

त्यामुळे हरिश्चंद्र जाधव याने दि. २९ जुलै २०२३ रोजी दुपारी साडेतीन वाजता नायगाव येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी हरिश्चंद्र जाधव याने मी सासूरवाडीकडील लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चारापानी सुसाईड नोट मोबाईल फोनच्या कव्हरमध्ये ठेवली असल्याचे पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी सासूरवाडीच्या सहा जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला आत्महत्यास प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office