अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त गौरी घुमट येथील गौरीशंकर मित्रमंडळाच्या वतीने तुळजाभवानी मातेच्या मंदिरात विधिवत अभिषेक करुन मंडळाचे संस्थापक वसंत लोढा व माजी नगराध्यक्षा लता लोढा यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
मंदिरे उघडल्याने जर गुन्हा दाखल झाला तरी न घाबरता त्यास तोंड देवू, पण हे मंदिर बंद करणार नाही, अस ईशारा घटस्थापनेनिमित्त लोढा यांनी दिला.
राज्यातील आघाडी सरकारने भाविकांच्या भावनांचा विचार न करता नवरात्रातही मंदिरे बंद ठेवली आहेत. मंदिरे न उघडण्याच्या निर्णयाचे गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही निषेध करत आहोत.
केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देशातील मंदिरे उघडण्याचा आदेश केव्हाच दिले आहे. मात्र केंद्र सरकारचा एक व राज्य सरकारचा वेगळाच आदेश आहे.
राज्य सरकारने मंदिरे उघडली नाही तर भाविकांच्या सहन शक्तीचा अंत होईल व मोठा उद्रेक राज्यात होईल. तरी तुळजाभवानी मातेने राज्यातील मंदिरे लवकरात लवकर उघडण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी अशी मागणी गौरी शंकर मित्र मंडळ ट्रस्ट अध्यक्ष वसंत लोढा यांनी याप्रसंगी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved