अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : निंबळक बायपास येथे भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय रावळेराम वैराळ (वय २६, रा. खातगाव टाळकी, ता. नगर) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, वैराळ हे केडगाव ते विळद रस्त्याने दुचाकीबरून जात असताना निंबळक बायपासजवळ भरधाव वेगातील वाहनाने जोराची धडक देऊन वाहनचालक पसार झाला.
या धडकेत गंभीर जखमी झाल्याने विजय वैराळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात छगन मल्हारी वैराळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews