अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- ठाण्याहून टाकळी ढोकेश्वर येथे आलेल्या ३६ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली.
तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या आता पाच झाली आहे. सर्व पाच रुग्ण मुंबई, ठाण्याहून आलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून टाकळी ढोकेश्वर येथील बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली.
हिवरे कोरडा येथील बाधीत तरुणासह कुटुंबातील इतर तीन व्यक्ती व टाकळी ढोकेश्वर येथील पत्नी, पत्नी आणि दोन मुलांनी ठाणे ते टाकळी ढोकेश्वरदरम्यान एकाच गाडीतून प्रवास केला होता.
दुसऱ्या दिवशी टाकळी ढोकेश्वर येथील बाधीत महिलेचा दीर ठाणे येथून टाकळी ढोकेश्वर येथे कुटुंबासह आला. हिवरेकोरडा येथील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने
त्याची पत्नी, दोन मुली व संपर्कातील टाकळी ढोकेश्वर येथील आठ व्यक्तींना तालुका प्रशासनाने बुधवारी तपासणीसाठी नगरला पाठवले होते.
कोरोनाबाधिताच्या १८ वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. टाकळी ढोकेश्वर येथील व्यक्तींची चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा
जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, रविवारी टाकळी ढोकेश्वर येथील ३६ वर्षीय महिलेचा अहवाल सकारात्मक आल्याने खळबळ उडाली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews