शास्तीमाफीला मुदतवाढ दिल्याने मोठा दिलासा’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-महापालिकेने मालमत्ता करावर ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती. या माफीची मुदत नोव्हेंबरअखेर संपणार होती.

ही मुदत वाढवण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापाैर भगवान फुलसाैंदर व मी आयुक्तांकडे केली. त्यानुसार मुदतवाढ झाली आहे.

मोठ्या प्रमाणात कर जमा होऊन महापालिकेचे कामे चांगल्या प्रकारे मार्गी लावता येतील. महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24